शिरागड ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी योगिता सोनवणे

0

लोकशाही न्युज नेटवर्क

शिरागड-पथराडे गृप ग्रामपंचायतच्या निवडणूकीत लोकनियुक्त सरपंचपदी योगिताताई प्रताप सोनवणे ५१ मतांनी निवडुन आल्या आहेत. प्रथमच लोकनियुक्त सरपंच पदाकरीता तीन महिला रीगणात होत्या. यात योगिता प्रताप सोनवणे यांना २२६ मते पडली, तर आशा साळंके यांना १७५ तर रेखा सोळंके यांना १२१ मते पडली.

ग्रामपंचायत सदस्स पदाकरीता रेखा ज्ञानेश्वर सोळंके बिनविरोध निवडुन आल्या असून, सदस्यपदी प्रताप पंडीत सोनवणे (१६० ), माया ज्ञानेश्वर धिवर (१५७) वैजंता राजाराम धिवर (१५७), निलेश श्रीधर धिवर (८०), आशा अनिल सोळंके (९२), रामकृष्ण तुळसिराम सोळंके (१३४), मतानी निवडुन आले.
नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच योगिताताई सोनवणे सह ग्रामपंचायत सदस्य प्रतापदादा सोनवणे, माया धिवर, वैजंता धिवर यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.

आ.चद्रकांत सोनवणे व आ.लता सोनवणे यांचा माध्यमातून गावात गेल्या पाच वर्षात विविध विकास कामे केल्याने त्या कामाची पावती मतदानाच्या साह्याने दिल्याने जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, अशी माहिती नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच योगिताताई सोनवणे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.