बापरे.. लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी (व्हिडीओ)

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

लोकल ही मुंबईची (Mumbai) लाईफलाईन आहे. या लोकलमध्ये (Mumbai Local) गर्दीच्या वेळी बसायला सीट मिळावी यासाठी प्रचंड चढाओढ असते. मग यावेळी नेहमी भांडणं होतात. पण लेडिज डब्ब्यात सीट वरून चक्क महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हिडीओ व्हायरल (Mumbai Local Women Fight) झालाय.

https://twitter.com/elokshahi/status/1578284766478012416?t=YuCuMiS_L5N1mPH2TlcPfw&s=09

या व्हायरल व्हिडीओमध्ये महिलांमध्ये WWE सारखी जबर मारहाण धावत्या लोकलमध्येच झाली. याच डब्ब्यात असणाऱ्या काही महिलांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

ही घटना मुंबईच्या ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर (Transharbor Railway Line) घडली. ठाणे-पनवेल लोकलदरम्यान (Thane-Panvel Local) ही हाणामारी झाली. वाशी रेल्वे पोलिसांनी (Vashi Railway Police) या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली.

लेडिज डब्ब्यात सीटवरुन भांडण झालं. दोन महिला तावातावाने एका तरुणीला जाब विचारत मारहाण करु लागल्याचं दिसून आलंय. केस ओढत, पाठीत बुक्के घालत, या महिलेवर इतर प्रवासी महिला तुटून पडल्या होत्या.

दरम्यान सोबत असलेल्या इतर महिला प्रवाशांनी तरुणीला होत असलेली मारहाण थांबवण्यासाठी दमदाटीही केली. पण संतापाच्या भरात मारहाण करण्यात आलेल्या तरुणीनंही स्वसंरक्षणासाठी हल्ला चढवल्याचं व्हिडीओत दिसून आलंय.

महिलांच्या या मारहाणीत एक महिला पोलीसही गंभीररीत्या जखमी झाली. या महिला पोलिसाच्या कपाळाला मार लागून रक्तस्रावही होत होता. महिला पोलिसासह एकूण दोघी जणी या घटनेत जखमी झाल्यात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.