जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट ! सतर्कतेचा इशारा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय हवामान खात्याने (Meteorological Department of India) दिलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) अतिवृष्टीसह विजांच्या कडकडाटांसह पाऊस (Rain) होण्याची शक्यता वर्तवला असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून नद्यांवरील लहान व मोठे प्रकल्पांचा धरणसाठा 100% पुर्ण भरलेला आहे. त्यामुळे सर्व लहान व मोठे धरणांच्या खालील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. परतीचा पाऊस विजांच्या कडकडाटांसह कोसळणार असल्याने पावसा दरम्यान विजा व अतिवृष्टी पासुन बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच याप्रसंगी झाडाखाली वीजवाहिनी अथवा ट्रान्सफार्मर जवळ थांबू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.