घोसाळकरांवर गोळीबार करणाऱ्या मॉरिसची स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या

0

मुंबई ;-शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर (vinod ghosalkar ) यांचे पुत्र आणि माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकर (abhishekh ghisalkar) यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मॉरिस नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दहिसर या ठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकरणी आता गोळीबार करणाऱ्या मॉरिसने (moris ) स्वतःवर गोळ्या झाडल्या आणि त्याचं आयुष्य संपवलं ही माहिती समोर आली आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.

 

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्याआधी त्याने फेसबुक live केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.