राजन विचारे यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेची झालेली फजिती आणि रंगलेल्या नाट्यमय घडामोडी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यामुळे अजून जास्त खोलात पाय जाऊ नये यासाठी शिवसेनेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत राजन विचारे यांची लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भावना गवळी यांना लोकसभा प्रतोदपदावरून हटविण्यात आले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून माहिती दिली आहे.

भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी म्हटले होते की एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य आहे. यामुळे भावना गवळी देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यामुळेच की काय शिवसेनेने भावना गवळी यांची उचलबांगडी करून लोकसभेतील प्रतोद पदावरून हटविले गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.