येवल्यातील घटनेचा काही तासांतच छडा…

0

येवला, लोकशाही न्यूज नेटवर्क

अफगाणी सुफी धर्मगुरूची हत्या ही त्यांच्या चालकानेच केल्याचा खुलासा नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केला आहे. निर्वासित असल्यामुळे धर्मगुरू मालमत्ता खरेदी करू शकत नव्हते. त्यामुळे संशयितांच्या नावाने गाडी आणि मालमत्ता खरेदी करण्यात आले असल्याचे समजते आहे. आज तालुका पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत त्यांनी हा खुलासा केला आहे….

दरम्यान पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले की, येवला तालुक्यातील चिचोंडी – बदापुर रोडच्या लगत असलेल्या आद्योगिक वसाहत परिसरात काल (दि.५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अफगाण नागरिक असलेल्या सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती (वय ३६) या धर्मगुरूवर गोळया झाडण्यात आल्या होत्या. मयत हे वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्वासित म्हणून राहत होते. त्यांना याठिकाणी राहण्याची परवानगी देण्यात आली होती. पैसा आणि मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात एकास अटक करण्यात आली असून ड्रायव्हर सह तिघे फरार असल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.