नशिराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क
सद्य परिस्थितीत गंभीर रस्ते अपघातांची मालिका ही अद्याप सुरूच असून अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरधाव बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झालेला असून याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर घटनेचा पंचनामा करून मृतदेह रूग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला.
रोशन मनोहर कोंगळे (वय २०) रा. झोडगा ता. मलकापूर जि. बुलढाणा असे मयत तरूणाचे नाव आहे. बुधवारी ६ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीने रोशन भुसावळ कडून जळगावकडे येतांना नशिराबाद रेल्वे उड्डाण पुलावर समोरून येणारी जळगावकडून मेहकरकडे भुसावळ मार्गे जाणारी भरधाव बसने (एमएच ४० एक्यू ६२७०) जोरदार धडक दिल्याने रोशन जागीच ठार झाला.