‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या भरपूर दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलै ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. प्रेक्षकांसह दिग्दर्शक करण जोहरला (Karan Johar) देखील या चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होत्या. प्रेक्षक आणि समिक्षकांचाही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. करणने बॉलिवूडचा जुना काळ पुन्हा मोठ्या पडद्यावर आणला आहे. आता चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग करत पहिल्याच दिवशी दिवशी जबरदस्त कलेक्शन केले आहे.

पहिल्या दिवसाची कमाई
सूत्रांनुसार, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास ११. ५० कोटींचं कलेक्शन केलं आहे. आता हे चित्रपटाच्या कमाईचे अंदाजे आकडे असले तरी, अधिकृत आकड्यांमध्ये काही बदल होऊ शकतो. हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये आलिया आणि रणवीरच्या चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली होती. आता या चित्रपटाला विकेंडचा फायदा देखील या चित्रपटाला होऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.