मुंबईत पावसाचे थैमान, दोन दिवसात वाढणार पावसाचा जोर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईसह राज्याला पावसानं झोडपले आहे. हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत सलग दुसऱ्यादिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत मंगळवारपासूनच पावसाने हजेरी लावली असून, आज बुधवारी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. मुंबईत पुढच्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने यावद्दल माहिती दिली असून मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी या राज्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात पावसाचा रेस अलर्ट देण्यात आला आहे.

सगळं दोन दिवस मुसळधार पाऊस
मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईसह राज्यातही पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात पुढील चार दिवस पाऊस वाढणार आहे. १९ आणि २० जुलै मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट तर, २१ आणि २२ जुलै ला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे, आणि सातारा, या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.