चाळीसगावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन तरुणाशी एका महिलेविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून तिचे शिक्षण सुरु असतांना एका अल्पवयीन संशयित आरोपीने गेल्या आठ दिवसांपूर्वी पीडित मुलीसह घरच्यांना फावणुकीची धमकी देत, तोंड बंद करण्यास सांगितले. शहरातील विविध भागात पीडितेवर २९ जून २०२३ व त्यांनतर आठ दिवसांनंतर अत्याचार केल्याची तक्रार नमूद करण्यात आली आहे. या घृणास्पद कृत्यात एका महिलेने आरोपीस मदत केल्याची तक्रार करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.