संस्कार ऊर्जा अधिकृत लघुउद्योग प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कल्याणी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था रोजगार निर्मिती अंतर्गत संस्कार ऊर्जा अधिकृत लघुउद्योग प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा शिवाजी नगर जळगाव येथे काल सकाळी 12 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाला उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून डॉ सुनिताताई मोडक लाभल्या तसेच प्रमुख अतिथी रेखा जाधव राष्ट्रीय अध्यक्षा कल्याणी संस्था मा. निलेश दादा इंगळे राष्ट्रीय उपाध्यक्ष कल्याणी संस्था सामाजिक कार्यकर्ता मा. निलेश तायडे उर्फ निलु आबा व आपल्या परिसरातील सुशिक्षित युवक व महिलांना रोजगार हमी योजनांचे मार्गदर्शन मिळावे तसेच अनुभव नसलेल्या मुलांना करिअर व रोजगार संदर्भात मदत व्हावी यासाठी प्रयत्न करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध रोजगार उपक्रम प्रत्येकाच्या घरात रोजगार जावा त्या दृष्टिकोनातून संस्कार ऊर्जा अधिकृत लघुउद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

त्याचबरोबर गाव तिथे रोजगार जळगाव जिल्हा संपूर्ण ग्रामीण भागातील प्रत्येक गावात कल्याणी संस्था रोजगार मिळावे घेत आहेत प्रत्येक गावात सर्व लाभार्थी बचत गटातील महिलांचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभत आहे. काल 4 वाजता अमळनेर तालुका देवळी या गावी गाव तिथे रोजगार हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तेथील लाभार्थी महीला व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत मेळाव्याला 100 महीलांनी हजेरी लावली. एक पाऊल रोजगाराकडे व राष्ट्रहीताकडे याची सुरुवात कल्याणी संस्थेने महाराष्ट्रभर सुरू केलेली आहे आणि यात कल्याणी संस्थेचे पदाधिकारी गावोगाव फिरत आहे. आयोजक सपना श्रीवास्तव अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रोजगार विभाग कल्याणी संस्था व संस्थापक संस्कार ऊर्जा सेवा बहुउद्देशीय संस्था तसेच सदस्य योगानंद कोळी नितीन मोहिते व कार्यकारणी सभासद लाभार्थी महिला यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.

Leave A Reply

Your email address will not be published.