अखेर प्रतीक्षा संपली, जळगावात सकाळपासूनच पावसाची जोरदार हजेरी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

देशालीत अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. त्याचे पडसाद राज्यातील अनेक ठिकाणी उमट असून, जळगाव शहरात देखील पावसाचे आगमन झाले. ४ ते ५ पाऊस कायम असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. काल रात्री पासून पावसाला सुरुवात झाली होती. जून महिना संपूर्ण कोरडा गेल्यावर अखेर जुलै मध्ये जळगावकरांची प्रतीक्षा संपली आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट जारी
राज्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, कोकणात रायगड, रत्नागिरीसह मुंबई आणि परिसरात देखील मुसळधार पशु कोसळत आहे. या दरम्यान जनजीवन विस्कळीत झाले आहे. या दरम्यान अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असून, रायगड जिल्ह्यात रेट अलर्ट जरी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्यात ऑरेंज आलेत जारी करण्यात आला असून, सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.