ब्रेकिंग; शिवसेनेचा ठाकरे गटाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधिमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार विप्लव बाजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अटच या आमदारांच्या अपात्रतेवर काय निर्णय घेतला जातो यावर सर्वांचं लक्ष लागला आहे.

मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बाजोरिया काही दिवसांपाऊर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. या तिन्ही आमदारांनी पक्ष सोडतांना पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. तसेच पक्षातील अनागोंदी कारभारावरही टीका केली होती. तसेच पक्षातील काही नेत्यांवरही टीकास्त्र डागले होते. या तिघांनी ठाकरे पक्ष सोडल्यानंतर त्यांच्यावर ठाकरे गटाकडून कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या तिघांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाने तस पत्रच विधिमंडळ सचिवांना दिल आहे. त्यामुळे विधिमंडळ सचिव काय निर्णय घेतात एकसे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.