केदारनाथला जाताय? जाणून घ्या नवीन नियम व अटी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पवित्र चार धाममध्ये सर्वात लोकप्रिय सलेल्या केदारनाथ (Kedarnath) मंदिरामध्ये आता मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. येथे येणाऱ्या भानिकांना आता मंदिर परिसरात फोन वापरता येणार नाही. काही दिवसांपूर्वीच मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात रिल्स आणि व्हिडिओ बनविण्यास बंदी घातली होती. त्यानंतर आता मंदिर प्रशासनाने मोबाईल संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केदारनाथ मंदिरात भाविकांना मोबाईल फोन घेऊन जात येणार नाही.

रील्सच्या मोहापोटी पवित्र्य भंग
केदारनाथ धार्मिक स्थळ असून या ठिकाणी व्हायरल होण्यासाठी तरुण मंडळी व्हिडीओ काढून इंस्टाग्रामवर पोस्ट करतात. काही दिवसापूर्वी या ठिकाणाहून व्हिडीओ, आणि रील्स व्हायरल झाले होते. या व्हायरल व्हिडीओमुले पावित्र्य भंग होत असून, भावना दुखावल्याचे आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने आता मोबाईल फोनवर बंदी घातली आहे. या यासोबतच मंदिर समितीने कपडे घालण्याबाबत नवीन नियम लागू केले आहेत. काही दिवसांपूर्वा केदारनाथ मंदिर परिसरातील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. व त्यामुळे वाद ओढवला गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.