संभाजीनगर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

संभाजीनगर-पुणे महामार्गावर रोजच अपघातांची मालिका सुरु असून भरधाव वेगातील बसने कराल मागून जोरात धडक दिल्याने कारमधील एक जण जागीच ठार झाला तर, पाच जण जखमी झाले आहे. हि घटना लिंबेजळगाव (ता. गंगापूर) जवळील पुलाशेजारी रविवारी दि. १७ जुलै रोजी रात्री १२ च्या सुमारास घडली. सय्यद जावेद सय्यद हनीफ (वय.३३) रा. देऊळगाव, ता. देऊळगावराजा जिल्हा.बुलढाणा असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागरकडून संभाजीनगरकडे रात्री साडे अकराच्या सुमारास MH 28, AZ5786 सुझुकी ब्रेझा कार जात असतांना पाठीमागून भरधाव वेगात असलेल्या बस MH 12 VF 4034 शिवाई इलेट्रीक बस ही ब्रेझा गादीवर धडकल्याने ब्रेझा गाडीतील तरुण ठार झाला तर कारमधील शेख वसीम शेख (वय ३०) रा.देऊळगाव मही, शेख इसाक शेख गुलाम वय.28 वर्ष. रा. देऊळगाव मही, शेख समीर शेख नजीर वय. 27 वर्ष रा..देऊळगाव मही, शेख कलीम शेख रहीम वय.32 वर्ष. रा. देऊळगाव मही.ता. देऊळगावराजा जिल्हा.बुलढाणा हे जखमी झाले आहेत.

अपघात होतकंच शेजारील हॉटेलमालकांनी पोलिसांना कळविले =, ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी घटना महामार्गावर घडल्याने काही वेळ रस्ता जाम झाला होता. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रस्ता मोकळा केला. या प्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात बसचालका विरोधात गुंग नोंदविण्यात आला असून, पुढील तपस पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.