मुंबईत खळबळ, शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई पोलिसांना आलेल्या एका फोन मुळे एकाच खळबळ उडाली आहे. फोनवर एका अज्ञात व्यक्तीने मुंबईत आणि पुणे शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. फोन करणाऱ्या फोनवर आपली मागणी देखील सांगितली आहे. एवढच नाही त्याची मागणी पूर्ण झाली तर तो आपल्या माणसांसोबत विदेशात निघून जाईल असे त्याने सांगितले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन करणारा कोण आहे? याचा तपास पोलिसांकडून लावण्यात येत आहे. लवकरच त्याला अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

काय होती मागणी
२४ जुन रोजी संध्याकाळी ६.३० वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला या ठिकाणी बॉम्बस्फोट करणार असल्याचे सांगितले आहे. पण समोर एक अट त्याने ठेवली, आपणास दोन लाख रुपयांची गरज आहे. रक्कम मिळाल्यानंतर आपण बॉम्बस्फोट थांबवू शकतो असे त्या अज्ञात व्यक्तीने फोने करून सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.