संतापजनक; ८ महिन्याच्या मुलीला पोत्यात भरून फेकले रस्त्यावर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

स्त्री भ्रूणहत्येसाठी गाजलेल्या बीडच्या परळीमध्ये पुन्हा एकदा मुलीला फेकून दिल्याची संपतजनक घटना समोर आली आहे. अज्ञातांनी ८ महिन्यांच्या मुलीला पोत्यात गुंडाळून परळीमध्ये ६ किलोमीटर अंतरावर माळेवाडी रोडवर फेकून दिल. परिसरातील एका व्यक्तीने याविषयी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या ८ महिन्याच्या चिमुकलीचे प्राण वाचले आहेत. सध्या या चिमुकल्या मुलीवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने फोन करून माहिती दिली की, मालेवाडी रोड लगत एका मुलीला पोत्यात गुंडाळून फेकलं आहे. मात्र हे क्रूर कृत्य कुणी केलं हे मला माहित नाही. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या टीमसह सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते घटनास्थळी दाखल झाले. एक साधारण ८ महिन्यांची मुलगी तीच अर्धशरीर पोत्यात आणि पाय बाहेर अशा स्थितीत आढळून आले आहे. संबंधित पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सदर चिमुकल्या मुलीस परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणून उपचारार्थ दाखल केले. पोटात अन्न पाणी नसल्याकारणाने चिमुकली फारच अशक्त झाली होती. मात्र उपचारानंतर तिची तब्येत चांगली होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

याप्रकरणी अद्याप परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला नसून, पोलिसांकडून तपास सुरु आहे. ही चिमुकली नेमकी कुणी फेकली ? निर्दयी मातेने फेकली की अन्य काही प्रकार आहे. याचा देखील तपास सुरू आहे. दरम्यान यामुळं परळीसह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.