उद्धव ठाकरे गटाचे आ. रवींद्र वायकर , राजन विचारे यांच्या घरावर ईडीचे छापे

0

मुंबई ;- शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी ४ वाजता निकाल जाहीर करणार असल्याने अशातच आज आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने वायकर यांच्या ७ ठिकाणांवर ही छापेमारी केल्याची माहिती आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीने छापा टाकला आहे. ईडीचे दहा ते बारा अधिकारी वायकर यांच्या घरी दाखल झाल्याची माहिती आहे. जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकर हे ईडीच्या रडारवर होते. सकाळी 8:30 वाजल्यापासून ईडीचे अधिकारी वायकर यांच्या घरी दाखल झाल्याचे बोलले जात आहे. आमदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह अशा एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे.

ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा टाकल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आमदार रवींद्र वायकरांनंतर आता खासदार राजन विचारे टार्गेटवर असल्याची त्याचबरोबर तपास संस्थांकडून आज ठाकरे गट निशाण्यावर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.