‘भूल भुलैया 3’च्या चित्रीकरणास लवकरच सुरुवात !

विद्या बालन साकारणार 'हे' पात्र

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहे. कार्तिकने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. तर तो आता निर्माता-दिग्दर्शकांची पहिली पसंती आहे. २०२४ मध्ये त्याचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात प्रेक्षकांना सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती ‘भूल भुलैया 3’ची.

Karthik Aryanलवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरु करणारे आहे तर दुसरीकडे या चित्रपटात नॅशनल क्रश तृप्ती डिमरी या चित्रपटात कार्तिकसोबत रोमान्स करताना दिसेल अशा चर्चा असताना आता ‘भूल भुलैय्या ३’ मधून तब्बूचा पत्ता कट झाल्याचे समोर आले आहे. आता तब्बू ऐवजी विद्या बालन पुन्हा मंजुलीकाची भूमिका साकारणार असल्याचा दावा मिडिया रिपोटमध्ये करण्यात येत आहे.

‘भूल भुलैय्या ३’ ची कास्टिंग सुरु आहे आणि निर्माते चित्रपटाच्या या तिसऱ्या भागात मंजुलीकाची भूमिका साकारण्यासाठी विद्या बालनशी चर्चा करत आहे’. ‘भूल भुलैय्या’मध्ये विद्याने मंजुलीकाची भूमिका करून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. तर, ‘भूल भुलैय्या २’ मध्ये तब्बूला कास्ट करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा या चित्रपटात विद्या बालन दिसणार असल्याने प्रेक्षक उत्सुक आहे.

अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाची शुटिंग फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे. ‘भूल भुलैया 3’पूर्वी कार्तिक ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.