गेट अंगावर पडल्याने जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुलाच्या अकाली मृत्यूचा आघात सोसूनही भारंबे कुटुंबीयांचा नेत्रदानाचा निर्णय

0

 

मुक्ताईनगर ,लोकशाही न्युज नेटवर्क:

 

वॉल कंपाऊंडचे वजनदार गेट उघडताना अचानक गेट तुटून दहा वर्षे बालकाच्या अंगावर पडून बालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 28 मार्च मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे तहसील कार्यालय शेजारी घडली. डॉ. जगदीश पाटील यांच्याकडे प्राथमिक उपचार करून जखमी बालकास पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले होते. गंभीर जखमी बालक ओम प्रमोद भारंबे याची मृत्यूची झुंज सुरू होती. डॉक्टरही त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत होते .

परंतु ओमची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपून 29 मार्च बुधवार रोजी दुपारी तीन वाजून 56 मिनिटांनी त्याने अखेरचा श्वास घेतला. अकाली निधन झाल्याचा मोठा आघात पित्यावर असतानाही प्रमोद हरी भारंबे यांनी आपल्या लहानग्या मुलाचे नेत्र दान देण्याचा निर्णय घेऊन बालकांच्या स्मृती जिवंत ठेवल्या आहेत. संकटात ही अवयव दानाची समय सूचकता ठेवून भारंबे कुटुंबियांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.