जीगाव प्रकल्पग्रस्तांना धमकावून खंडणी मागणाऱ्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल

0

जळगाव जामोद ,लोकशाही न्युज नेटवर्क

जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव बु व खुर्द परिसरातील जिगाव प्रकल्पा अंतर्गत बुडीत क्षेत्रातील जमिनी शासन संपादीत करत असून त्या मोबदल्यात ग्रामवासियांना मोबदला मिळणार आहे. यासाठी प्रकल्पग्रस्तांकडून खंडणी मागणाऱ्या गावातीलच रतन दुलाजी नाईक व रमेश सखाराम नाईक या दोघांविरूध्द जळगाव जामोद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात वृत्त असे की, 6 मार्च 2023 रोजी रतन नाईक व रमेश नाईक यांनी बेकायदेशीररित्या जिगाव प्रकल्प अंतर्गत संपादीत करण्यात येत असलेल्या ग्राम गोळेगाव खुर्द व बु .परिसरातील शेतजमिनीवर ड्रोन कॅमेरा फिरवला व चित्रफीत काढून शासनाकडे सादर करू असे सांगून प्रकल्पग्रस्तांकडून पैसे उकळत होते.

पैसे दिले नाहीतर शासनाकडून मिळणारी रक्कम मिळू देणार नाही अशी भितीवजा धमकी देत होते. यासंदर्भात गोळेगाव खुर्दचे सरपंच सुनील गव्हाळे व गोळेगाव बु. चे सरपंच पती राजेंद्र हुरसाळ व ग्रामस्थांनी 6 मार्च 2023 रोजी जळगाव जामोद पोस्टेला निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकाराची पडताळणी करुन पोलीसांनी 28 मार्च रोजी खंडणी व धमकीच्या कलमांन्वये दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार दिनेश झामरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पांडुरंग इंगळे हे करीत आहेत.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.