आयपीएलच्या रन संग्रामाला उद्यापासून होणार प्रारंभ

0

नवी दिल्ली ,लोकशाही न्युज नेटवर्क

जगातील सर्वात मोठ्या टी 20 क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार असून आयपीएलचा थरार क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. 31 मार्च पासून आयपीएलच्या ‘रन’संग्रामाला प्रारंभ होणार असून पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र स्टेडियमवर रंगणार आहे.आयपीएलमध्ये एकूण 52 दिवसांमध्ये सुमारे 70 लीग सामने खेळले जातील. तर फायनलचा सामना 1 जून रोजी खेळवला जाईल.

उद्या सायंकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. आयपीएल सीजन सुरु झाल्यावर एका दिवशी दोन सामने असल्यास पहिला सामना दुपारी 03:30 वाजता तर दुसरा सामना संध्याकाळी 07:30 वाजता सुरू होईल. यंदा तब्बल दोन वर्षांनी आयपीएलचे सामने संघांच्या होम ग्राउंडवर रंगणार आहेत. भारतातील 10 शहरांमधील क्रिकेट स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन केले जाणार आहे.

तब्बल दोन महिने आयपीएलची स्पर्धा रंगणार असून यंदाच्या 16 व्या सीजनची ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये यंदा 10 संघांचा समावेश आहे. यात मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली चॅलेंजर्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात टायटन्स इत्यादी संघांचा समावेश आहे. आयपीएलचा पहिला सामना 31 मार्च शनिवारी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.