अमळनेरात श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

0

दिवसभरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन,दर्शनासाठी लागल्या रांगा

अमळनेर ,लोकशाही न्युज नेटवर्क

येथील प्रताप महाविद्यालयाजवळील पुरातन व भव्य श्रीराम मंदिरात राम नवमीनिमित्त श्री राम जन्मोत्सव अतिशय थाटात साजरा झाला,दिवसभरात हजारो भाविकांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्याने मंदिरात रांगा लागल्या होत्या.

दुपारी 12 वाजता जन्मोत्सव असल्याने हा उत्सव पाहण्यासाठी सकाळी 10 वाजेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती,महिला व पुरुषांच्या उपस्थितीने सभागृह हाऊसफुल्ल झाले होते.दुपारी ठीक 12 वाजता गाभाऱ्याचा परदा खुला करण्यात आला त्यानंतर श्रीमंत प्रताप सेठजी यांच्या परिवारातील संगीता एम अग्रवाल,मिलिंद एम अग्रवाल,मयंक एम अग्रवाल,सृष्टी लखोटीया अग्रवाल यांच्या हस्ते पूजन होऊन महाआरती करत जन्मोत्सव साजरा करण्यात,यावेळी प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता,आरती नंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती,जन्मोत्सव साठी पुजारी सारंग कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चौधरी,महेंद्र परदेशी,सेवक सत्यवान महाजन यांनी सेवाकार्य केले.यावेळी उद्योजक बजरंगलाल अग्रवाल,खा शि मंडळाचे कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडा,जितेंद्र जैन,विनोद अग्रवाल,जितेंद्र अग्रवाल,प्रसन्ना जैन,संदेश शर्मा,अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,विवेक नाईक यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती,अग्रवाल परिवाराकडून राम भक्तांना खिचडी व टरबूज आणि प्रसाद चे वाटप करण्यात आले.रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरूच होती.

नगरसेवक नरेंद्र चौधरीकडून सरबत वाटत

बंगाली फाईल परिसराचे माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी व माजी नगराध्यक्षा सौ भारती नरेंद्र चौधरी यांच्या वतीने भाविकांसाठी थंडगार सरबत ची व्यवस्था करण्यात आली होती,उन्हाचे चटके सुरु झाल्याने अश्या गरमित या थंड व गोड सरबत मुळे भाविकांना गारवा मिळाला,दिवसभरात आलेल्या सर्व भाविकांनी सरबत चा लाभ घेतला,यासाठी परिसरातील मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.राम नवमी मिळे मंदिर परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.