राष्ट्रवादीला खिंडार..असंख्य कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुक्ताईनगर मतदारसंघातील खडसे समर्थक असलेल्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते असंख्य कार्यकर्त्यांनी  बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आज जळगाव येथील विश्रामगृहावर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना व बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरता तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारसंघातील खडसे समर्थक तसेच राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, रेंभोटा येथील छोटू पाटील, वाघाडीचे भैय्या पाटील, भूषण पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील, नगरसेवक आरिफ आझाद, पियुष मोरे, मुकेश वानखेडे उपस्थित होते.

यांनी घेतला प्रवेश

मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादीचे जिल्ह सोशियल मेडिया सेल् प्रमुख माजी जिल्हाध्यक्ष  शिवराज पाटील, वाय. डी. पाटील, निंभोरा स्टेशन राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस रावेर, प्रशांत पाटील उपसरपंच निंभोरा स्टेशन, राष्ट्रवादी सोशियल मीडिया ब्लॉगर शुभम मुर्हेकर धामोडी ता. रावेर यांनी आज त्यांचे कार्यकर्त्यांसाहित शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.