“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय हल्ला नाही”- संजय राऊत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद (Maharashtra Karnataka border dispute) दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. या सीमावादावाचे पडसाद आता दोन्ही राज्यातील वाहनांवर उमटत आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी ‘ऊठ मराठ्या ऊठ’ अशी साद घालत केंद्र सरकारवर (Central Govt) जोरदार निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांनी ट्विट (Tweet) केलं आहे. दिल्लीचया पाठिंब्या शिवाय बेळगावात (Belgaum) मराठी माणूस व महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे. ऊठ मराठ्या ऊठ ! असं राऊत यांनी ट्विट केलं आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता. तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या (Delhi) दारातील पायपुसणे करून टाकले. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढ पणा आहे. अशी टीका राऊत यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.