होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता अभियान

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिन निम्मिताने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

जळगाव जिल्हा समादेशक होमगार्डस् यांच्या आदेशानुसार होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिन ६ डिसेंबर रोजी ७६ वा दिन असुुन साप्ताहिक परेड प्रसंगी शहरातील पोलीस कवायत मैदान, तहसील कार्यालय परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच साप्ताहिक परेड घेण्यात आली.

होमगार्ड यांना होमगार्ड व नागरी संरक्षण दलातील त्यांचे कर्तव्य, जबाबदारीचे योगदान यांची जाणीव व त्याबाबतची माहिती देण्यात आली. या प्रसंगी तालुका समादेशक अधिकारी प्रशांत पवार, लिपीक हिलाल नेरपगार, होमगार्ड संजय येवले, मनोज महाजन, अशोक पाटील, अनिल वाघ, भरत चव्हाण, अनिल पाटील, वाल्मिक कोळी, अरुण शिरसाठ, शरद पाटील असे एकूण ३४ पुरुष व ५ महिला होमगार्ड हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.