संतापजनक : मूकबधिर तरुणीवर सामूहिक अत्याचार

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव (Chalisgaon) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील एका गावाजवळ असलेल्या तलावाजवळ 25 वर्षीय मूकबधिर तरुणीला मारहाण करून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात बुधवारी तिघांविरोधात अत्याचाराचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून नराधमांचा कसून शोध सुरू केला आहे.

25 वर्षीय पिडीता मूकबधिर असून गावाजवळ असलेल्या एका तलावाजवळ तीन संशयितांपैकी दोघांनी डोक्यावर मारहाण केली. त्यानंतर त्यातील एकाने पिडीतेवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री 8 वाजता घडली आहे. सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत तिघे तरुण तिच्यावर अत्याचार करीत होते. अत्यवस्थ अवस्थेत सोमवारी सकाळी ही तरुणी घरी पोहोचली. यानंतर तीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला.

पीडित मुकबधीर असल्यामुळे तिने पोलिसांना माहिती देण्यासाठी विशेष शिक्षिकेसमोर इशाऱ्याने हा सर्व प्रकार सांगितला. तसेच अत्याचार करणारे समोर आल्यास त्यांना ओळखेल असेही तिने सांगितले आहे.

दरम्यान या घटनेमुळे संपुर्ण चाळीसगाव तालुका हादरला आहे. रात्रभर अमानुषपणे अत्याचार केल्यामुळे तरुणीची प्रकृती अत्यव्यस्थ झाली आहे. तरुणीवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर तीनही संशयित बेपत्ता झाले आहेत. ते शेजारच्या गावातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख हे करीत आहेत. तिच्यावर धुळ्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.