बिडगाव येथील जवानाला गुवाहाटीत वीरमरण ; गुरुवारी होणार अंत्यसंस्कार…

0

 

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

बिडगाव येथील रहीवाशी व आयटीबीपी च्या सेवत असलेल्या जवानाचा गुवाहाटी येथे उपचार घेत असतांना मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी १० वाजता बिडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Soldier from Bidgaon martyred in Guwahati)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिडगाव येथील हिरामण झावरू पाटील यांचे सुपूत्र अशोक हिरामण पाटील (३५) हे अरुणाचल प्रदेश येथील युपीया येथे इंडियन तिबेट बॉर्डर फोर्स येथे सेवेत होते. त्यांना पाच दिवसापूर्वी डोक्यात त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांची तब्येत खालावली, त्यानंतर त्यांना आसाम येथील गुवाहाटीच्या सैनिक रुग्णालयात हलविण्यात आले होते, तेथे उपचार सुरु असतांना मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचे पार्थिव गुवाहाटीहून राहत्या गावी बिडगाव येथे आणले जाणार आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. असोक पाटील यांचे देशसेवा करीत असतांना विरमरण आल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. अशोक पाटील यांच्या पश्यात आई वडील,  पत्नी, दोन मुलं, तिन बहीणी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.