पुण्याच्या ससून रुग्णालयातील आयसीयूत उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू

0

पुणे:- ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेल्या पुण्याच्या ससून रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सागर रेणुसे (३०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तरुणाच्या निधनानंतर नातेवाईकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला होता. सुरुवातीला ससूनच्या डॉक्टरांनीयाला नकार दिला. मात्र, त्यानंतर सागर रेणुसेच्या शरीरावर उंदीर चावल्याच्या खुणा असल्याचे डॉक्टरांनी मान्य केले.रेणुसे या तरुणाचा भोर तालुक्यात अपघात झाला होता.

त्यानंतरत्याला १६ मार्चला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, २६ मार्च रोजी त्याची प्रकृती खालावली. तेव्हा उंदीर चावल्याने त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे समोर आले.

आयसीयूमध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांनाउंदराने चावा घेतला. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन मंगळवारी सकाळी त्याचे निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.