इंदूरमध्ये ‘एप्रिल फूल’ बनवताना चुकीने गळफास ;  विद्यार्थ्यांने गमावला प्राण

0

इंदूर : एप्रिल महिन्याच्या १ तारखेला मित्राला कथितरीत्या ‘एप्रिल फूल’ बनवताना चुकीने गळफास लागल्याने १८ वर्षीय विद्यार्थ्याला प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडली.

अभिषेक रघुवंशी असे मरण पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याने आपल्या मित्राला एप्रिल फूल न बनवण्यासाठी व्हिडीओ कॉल – केला. यावेळी त्याने गळ्याला दोरीने – फास लावत आत्महत्या करण्याचा 2 • दिखावा केला. याचदरम्यान त्याच्या و • पायाखालचा स्टूल सरकला व खरोखरच गळफास बसला. • त्यामुळे अभिषेक रघुवंशीवर मृत्यू ओढावला, अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश दंडोतिया न यांनी दिली. अभिषेक हा शहरातील 1 वरिष्ठ अधिकाऱ्याच्या (एसडीएम) 1 वाहनचालकाचा मुलगा होता. चुकीने व गळफास लागल्याने त्याच्यावर मृत्यू ओढावला.

Leave A Reply

Your email address will not be published.