मोहम्मद सिराजचा आणखी एक पराक्रम, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आशिया चषकाच्या फायनल सामन्यात दमदार खेळी करणाऱ्या मोहम्मद सिराजने आणखी एक पराक्रम आपल्या नावे केला आहे. विश्वचषकाआधी मोहम्मद सिराज वनडे क्रिकेटमध्ये नंबर एकचा गोलंदाज बनला आहे. आयसीसीने वनडे क्रिकेटमधील गोलंदाजांची क्रमवारी जारी केली आहे. मोहम्मद सिराजने आठव्या क्रमांकावर झेप घेतलीआहे. आशिया चषकातील फायनलमध्ये सिराजने २१ धावांच्या मोबदल्यात सहा विकेट घेतल्या होत्या. सिराजच्या आक्रमक गोलंदाजीमुळे श्रीलंका संघाने ५० धावांत गुडघे टेकले होते. आणि याचाच फायदा सिराजला झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नवव्या क्रमांकारून पहिल्या क्रमांकावर
आशिया चषकाला सुरुवात होण्याआधी मोहम्मद सिराज 643 रेटिंग गुणांसह वनडे क्रमवारीत नवव्या क्रमांकावर होता. आशिया चषकात भेदक मारा केल्याचा फायदा याठिकाणी सिराजला झाल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या क्रमवारीनुसार त्याने 8 स्थानांनी झेप घेत पहिले स्थान पटकावले आहे. सिराजचे आता 694 रेटिंग गुण आहेत. आशिया कप स्पर्धेमध्ये सिराजने 12.2 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या होत्या. याआधी मोहम्मद सिराज मार्च 2023 मध्ये वनडे क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचला होता, त्यानंतर जोश हेजलवुडने त्याला त्या स्थानावरून हटवले होते. आता पुन्हा एकदा सिराजने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.