भारत-कॅनडा वाद चिघळला, कॅनडाच्या नागरिकांना भारतात येण्यास बंदी !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

खलिस्थानी दहशदवाद्यांच्या हत्येनंतर भारत-कॅनडा मध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहे. यांनतर मोदी सरकारने मोठा निर्णय या संदर्भात घेतला आहे. कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणं अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आले आहे. याबाबत अधिकृत घोषणा जरी झाली नसली, तरी कॅनडामध्ये व्हिसा केंद्राचं संचालन करणाऱ्या बीएलएस इंटरनॅशनल वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

BSL इंटरनॅशनल वेबसाईटचा एक स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये “भारतीय व्हिसा सुविधा ही पुढील सूचना येईपर्यंत थांबविण्यात आली आहे”. अशी सूचना दिली जात आहे. ही सूचना कॅनडातील इंडियन मिशनकडून दिली असल्याचंही या वेबसाईटवर सांगण्यात आले आहे.

खलिस्थानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. भारताने हे आरोप फेटाळत कॅनडा खलिस्तानी दहशदवादी आणि गॅंगस्टर्सना आश्रय देत असल्याचं म्हंटले जात आहे. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. या वादचा परिणाम मात्र सामान्य जनतेवर होतांना दिसत आहे. दोन्ही देशांनी आपापल्या नागरिकांसाठी सूचना जारी केल्या होत्या. कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय उपस्थित आहेत. तसंच भारतात देखील कॅनडातील बरेच पर्यटक आणि विद्यार्थी येत असतात. यामुळे दोन्ही देशांमधील तणावाचा फटका या विद्यार्थी, कर्मचारी आणि पर्यटकांना बसताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.