प्रताप सरनाईकांना ED चा झटका; 11 कोटींची संपत्ती जप्त होणार

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिंदे गटात (Shinde Group) गेलेले आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांना ईडी (ED) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. ईडीने एनएसईएल घोटाळ्या प्रकरणी (NSEL Scam Case) तात्पुरती जप्त केलेल्या तब्बल 11 कोटींच्या संपत्तीचा ताबा घेण्याचा ईडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ईडीनं जप्त केलेली 11 कोटींची संपत्ती योग्य असल्याचा निर्णय क्वाशी ज्युरीशरी बॉडीने (Quashie Jury Body) दिला आहे.

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मालकीचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोड येथील भूखंडावर लवकरच ईडी मार्फत जप्ती येऊ शकते. सरनाईक यांची तब्बल 11 कोटींची संपत्ती सक्तवसुली संचलनालय ताब्यात घेणार आहे.

दरम्यान एनएसईएल घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं या संपत्तीवर तात्पुरती जप्ती आणली होती. आता संपूर्ण तपासानंतर या संपत्तीचा ताबा घेण्याचा ईडीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ईडीनं केलेल्या कारवाईविरोधात प्रताप सरनाईक देखील न्यायालयात दाद मागू शकतात.

नेमकं प्रकरण काय ?

2013 मध्ये एनएसईएल घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी ईडीनं चौकशी सुरू केली. एनएसईएल घोटाळा प्रकरणात संचालकांसह 25 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरू झाली होती. या घोटाळ्यातील गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेट, थकीत कर्जाची परतफेड आणि इतक कामांसाठी बेकायदेशीरपणे वापरली असल्याचं निष्पन्न झालं होतं. जवळपास 13 हजार गुंतवणुकदारांच्या 5600 कोटींच्या रक्कमेचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.