पाळधी येथे दादर बियाण्याचे मोफत वाटप

0

पाळधी (विवेक कुलकर्णी) लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाळधी येथे अन्नसुरक्षा मोहीम अंतर्गत प्रात्यक्षिक रब्बी ज्वारी, दादरचे फुले रेवती बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे, पाळधी बु. सरपंच प्रकाश पाटील व उपसरपंच चंदन कळमकर व तालुका कृषी अधिकारी किरण देसले, मा उपसरपंच अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य उदय झवर, सचिन पाटील, दीपक झवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी कृषी सहाय्यक गजानन मोरे यांनी शेतकरी बांधवांना बियाणे विषयी माहिती देऊन तृणधान्य विकासाच्या पेरा वाढावा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी श्री किरण देसले यांनी सन २०२३ हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष साजरे करण्याचे असल्याने संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना नगदी पिकासोबत तृणधान्य पिकाचा पेरा वाढविण्यासाठी आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.