रक्षाताईंना उमेदवारी अन्‌ चंद्रकांत पाटलांमध्ये नाराजी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेना (शिंदे) गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीत ही जागा भाजपाची असली तरी दुसरा उमेदवार दिला पाहिजे होता असेही  पाटील म्हणाले.

भाजपाने दुसऱ्या यादीत रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रक्षाताई खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने काही ठिकाणी नाराजीचे सूर आवळले गेले आहेत. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असून ते प्रचारात कसा सहभाग घेतील असा प्रश्न उपस्थित रहात आहे. पाटील म्हणाले की, रक्षाताईंना  उमेदवारी देणे हा भाजपाचा अंतर्गत विषय असला तरी ते महायुतीचे मुख्य घटक आहे. आम्ही महायुतीत सहभागी असून आमचाही विचार घेतला पाहिजे होता; मात्र तसे झाले नाही.

परिवार एक… पक्ष अनेक

एकनाथराव खडसे हे राजकारणातील मुरब्बी असून ते प्रत्येक विषयात आपले हित जोपासत असतात. परिवार एक आणि पक्ष अनेक अशी त्यांची स्थिती आहे. भाजपाला गळाला लावून त्यांनी रक्षा खडसेंना उमेदवारी मिळविली. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून स्वत:साठी उमेदवारी घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. खडसे ज्या प्रमाणे प्रचार करतील त्या प्रमाणे मीही प्रचार करेल असेही पाटील यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.