खडसे विरुद्ध खडसे संघर्ष होणार नाही- एकनाथराव खडसे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या रक्षाताई खडसे विरुद्ध राष्ट्रवादीच्या ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर असा संघर्ष होणार नसल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज सांगितले. पत्रकाराशी बोलतांना खडसे यांनी स्पष्ट शब्दात खडसे विरुद्ध खडसे असा सामना होणार नसल्याचे सांगितले.

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाने रक्षाताई खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून स्वत: एकनाथराव खडसे किंवा त्यांची कन्या ॲड. रोहिणी खडसे या उमेदवार म्हणून समोर येतील अशी शक्यता होती. राष्ट्रवादीने तर ॲड. रोहिणी खडसे यांच्या नावावर चर्चा देखील सुरु केली होती.

मात्र ॲड. खडसे यांना लोकसभेऐवजी विधानसभेला उमेदवारी हवी असल्याने त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. आता रक्षाताई खडसे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी आता नव्या उमेदवाराचा शोध घेत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.