वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींना पळविले

0

जळगाव ;- तालुक्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधून दोन वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी कि, अयोध्या नगर भागातून एका बांधकामच्या ठिकाणाहून १६ वर्षीय मुलगी बिस्कीट घेऊन येते असे सांगून निघून गेल्याची घटना १२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली . मजुरी करणाऱ्या तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून न आल्याने अखेर एमआयडीसी पोलीस स्टेशनला धाव घेत १३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली माहाजन करीत आहे.

तर दुसर्या घटनेत खेडी परिसरातून १२ रोजी सकाळी साडे अकरा ते साडे बारा वाजेच्या सुमारास १७ वर्षीय मुलगी राहत्या घरून निघून गेली . तिला कुणीतरी अज्ञात व्याक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सावकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.