जळगावात दुचाकीवरून अवैध गुटख्याची वाहतूक ; एक जण ताब्यात

0

जळगाव – : दुचाकीवरून बंदी असलेल्या गुटख्याची वाहतुक करताना मुकेश डालर रायसिंग (वय ३७, रा. संगम सोसायटी, रिंगरोड) याला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी सकाळी रिंगरोड परिसरात केली. त्याच्याकडून १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रिंगरोड परिसरात जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, कैलास शिंदे हे शनिवारी सकाळच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्याठिकाणाहन राज्यात प्रतिबंधित असलेला गुटख्याची मुकेश रायसिंग हा तरुण (एमएच १९ सी डी ०२७७) क्रमांकाच्या दुचाकीवरुन वाहतूक करत होता. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी संशयिताची चौकशी तपासणी केली. यावेळी त्या दुचाकीस्वाराने हा माल शहरातील वसंतशेठ यांच्याकडून घेतला असल्याचे चौकशीत सांगितले. तसेच त्याच्याजवळ सुमारे ३६ हजारांचा गुटख्यासह ७५ हजारांची दुचाकी असा एक्ट्रा १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मुकेश रायसिंग याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.