रोटरी वेस्टतर्फे सहा मान्यवरांना व्होकेशनल अवॉर्ड

0

जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे शहरातील विविध क्षेत्रातील सहा मान्यवरांना व्होकेशनल अवॉर्ड प्रदान करून गौरविण्यात आले.

रोटरीतर्फे जगभरात जानेवारी महिना व्होकेशनल मंथ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार रोटरी जळगाव वेस्टतर्फे मायादेवी नगर येथील रोटरी भवन मध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून वास्तुविशारद शिरीष बर्वे व क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास व कल्याण विभागाचे संचालक प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, अध्यक्ष सरिता खाचणे, मानद सचिव मुनिरा तरवारी आणि व्होकेशनल कमिटी चेअरमन विनीत जोशी यांची उपस्थिती होती.

डॉ.गिरीश सहस्रबुद्धे (वैद्यकीय), दिलीप गवळी (क्रीडा), प्रमोद झंवर (सामाजिक), तरुण भाटे (कला), उज्वला सावकारे (शिक्षण) आणि निखिल जाधव (उद्योग – स्टार्टअप) या मान्यवरांचा उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. लेकुरवाळे व शिरीष बर्वे यांनी मार्गदर्शन केले. पुरस्कारार्थींच्या वतीने डॉ.सहस्रबुद्धे यांनी भावना व्यक्त केल्या.

सोपं असतं वाट निवडण… कठीण असतं त्या वाटेवरून जाणं, सोपं असतं एकट जाणं…कठीण असतं सोबत घेऊन जाण, सोपं असतं केव्हाही थांबणं…कठीण असतं सातत्य राखणं, सोपं असतं गर्दीत मिसळणं…कठीण असतं जगावेगळे राहणं या विनीत जोशी यांच्या स्व-रचित कवितेचा सन्मानपत्रात समावेश केला होता.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन विनीत जोशी यांनी तर सत्कारार्थींचा परिचय सुनील सुखवानी व डॉ. आनंद दशपुत्रे यांनी करून दिला. आभार डॉ. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

यशस्वीतेसाठी रोटरक्ट जळगाव वेस्टचे अध्यक्ष प्रतीक वाणी, अक्षय वाणी यांच्यासह रोटरी वेस्टच्या व्होकेशनल कमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.