प्रेमी युगुलांचे धावत्या दुचाकीवर नको ते चाळे, व्हिडिओ व्हायरल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रेमी युगुल कधी काय करतील याचा काहीच नेम नसतो, सोशल मीडियावर तरुण-तरुणींचे फिल्मीस्टाइल रोमान्स करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अशातच आता थंडीपासून वाचण्यासाठी एका जोडप्याने केलेला जुगाड पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सोशल मीडियावर कपल्सचे मेट्रो ट्रेन, दुचाकी किंवा रेल्वे स्टेशनवर खुल्लम खुल्ला प्यार करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. यातील काही व्हिडिओमध्ये दुचाकीवर रोमान्स करतानाचे देखील काही व्हिडीओ समोर आले आहेत. अशात आता दुचाकीवर रोमान्स करतानाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, एक तरुण दुचाकी चालवत आहे. तरुणी त्याला समोरून मोठीच्या घेत टाकीवर बसली आहे. तसेच स्वतःच्या आणि प्रियकराच्या अंगावर ब्लॅंकेट घेतलं आहे. दुचाकीवर बसल्यानंतर तर आणखी जास्त थंडी वाजते. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रेमी युगुलाने असा जुगाड शोधलाय.

 

सोशल मिडीवावर @bandrabuzz या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पहिला आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहे. वांद्रे रेक्लेमेशन येथील हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली आहे.

व्हिडीओ पोस्ट करत यावर मुंबई पोलिसांना देखील टॅग करण्यात आलं आहे. अशा पद्धतीने अनेक जोडपी वाहतुकीचे नियम मोडतात. त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशा प्रेमी युगुलांवर तातडीने कारवाई करावी अशी विनंती देखील यावर कॅप्शनमध्ये करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.