जळगावात घरफोडी ; तीन लाखांचे दागिने ,रोकड लांबविली

0

जळगाव ;- बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरटयांनी सुमारे २ लाख ८९ हजाराचे दागिने आणि रोकड लांबविल्याची घटना १२ रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि, खासगी नोकरी करणारे सौरभ भिका महाजन हे रामानंद नगर जवळील नंदनवन कॉलनी येथे राहतात . ते आपल्या परिवारासह बाहेरगावी २७ डिसेंबर रोजी घर बंद करून गेले असता त्यांच्या बंद घराचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरटयांनी सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा २ लाख ८९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार १२ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास लक्षात आला . याप्रकरणी सौरभ महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नांगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.

हा मुद्देमाल केला लंपास
६० हजार रु. किमतीचे २० ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील पोत ,९०,हजार रु. किमतीच्या ५ सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी ६ ग्रॅम वजनाच्या , २७,हजार रु.किमतीचे ९ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील रिंगा व टॉप्स , ६ हजार किमतीच्या २ सोन्याच्या अंगठी प्रत्यको १ ग्रॅम वजनाची , ३०,हजार रु. किमतीचे १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा ,३० हजार रु. किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, १२ हजार रु.किमतीची एक ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ,६ हजार रु. किमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे आपट्याचे पान , १२००/- रु. किमतीच्या चांदीच्या पायतील साखळ्या , २२०० रु. किमतीचे .चांदीचे ४० ग्रॅम वजनाचे शिक्के २५ हजार रु. रोख असा एकुण २,८९,४०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.