डेटिंग ॲपवर ओळख, शासकीय ठेकेदाराचा महिलेवर ऑफिसमध्येच बलात्कार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या शासकीय ठेकेदाराने पतीपासून विभक्त झालेल्या २६ वर्षीय महिलेवर ऑफिसमध्येच बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडको भागातील भोज हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका ऑफिसमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यावेळी ठेकेदाराने संबंधित महिलेचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून पुढे ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला. अमोल विठ्ठल पाटील (वय ४० वर्ष, रा. टाऊन सेंटर, सिडको) असे आरोपीचे नाव आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२२ रोजी तिने एका मुस्लिम मुलासोबत लग्न केले होते. परंतु, काही दिवसांतच त्यांच्यात वाद झाल्याने एप्रिल २०२२ पासून ती त्याच्यापासून विभक्त एकटीच शहरात राहत आहे. एका खाजगी शिकवणी येथे शिक्षिका म्हणून ती काम करते. दरम्यानच्या काळात तिने डेटिंग ॲपवर खाते उघडले होते. त्यावेळी तिची अमोल पाटील याच्याशी ओळख झाली. तसेच तुझा बायोडाटा घेऊन माझ्या ऑफिसला ये असे पाटीलने पीडित महिलेला सांगितले. पीडित बायोडाटा घेऊन त्याच्या ऑफिसला गेली. तेव्हा त्याने माझी पत्नी मला सोडून नाशिकला राहते. मी सध्या आई वडील आणि भावासोबत राहतो. तू मला खूप आवडली असून आपण काही दिवसांनंतर लग्न करू असे म्हटला. तेव्हा तिने त्याला लग्नास नकार दिला. तेव्हा अमोलने तिच्यावर ऑफिसमध्ये बलात्कार करून तिचे फोटो आणि व्हिडिओ तयार केले. कोणाला काही सांगितले तर जगू देणार नाही अशी धमकी दिली. त्याच्या धाकाने तिने पोलिसात तक्रार दिली नव्हती.

महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पाटील तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. नेहमीच्या या अत्याचाराला कंटाळून अखेर महिलेने एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे गाठून १२ जानेवारीला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी बलात्काराच्या गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.