अल्पवयीन मुलीवर नराधमाचा जबरी अत्याचार ;एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

0

जळगाव;-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 12 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकारामुळे खळबळ उडाली असून नराधमाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील एका गावात राहणारा नराधम आरोपी योगेश तेजमल पवार यांनी लहान अल्पवयीन मुलीला माझी पत्नी सपना हिने तुला काशिनाथ याच्या घरी बोलावले असून वरच्या मजल्यावर जा असे सांगितले. मात्र योगेश पवार यांनी त्या ठिकाणी येऊन अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून घराची कडी आतून लावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. ही घटना 12 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी पीडित मुलीने एमआयडीसी पोलीस स्टेशनला रात्री नऊ वाजेच्या सुमारास नराधम योगेश पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर यांनी हा गुन्हा समक्ष नोंदवून याचा पुढील तपास एमआयडीसीचे सपोनी एसी मनोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.