जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांनी वयाच्या ७८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत आहे खास नातं

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठी सिनेसृष्टीत आपल्या भूमिकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील बऱ्यचा वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्नालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

रवींद्र बेर्डे यांची अजून एक म्हणजे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सुक्के भाऊ होते. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत देखील अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांच्यावर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान मागील दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. घरी आल्यानंतर यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. वयाच्या विसाव्या वर्षी ते १९६५ मध्ये रंगभूमीवर पदार्पण केलं. ३०० हुन अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची माने जिंकली आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.