परप्रांतीय तरूणाचा धावत्या रेल्वेून पडल्याने दुदैवी मृत्यू

0

जळगाव-;-उत्तरप्रदेश येथे जाणाऱ्या तरूणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली अप रेल्वेलाईनवर घडली . याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल राजेशकुमार यादव वय-२१ रा. सिध्दार्थ नगर, उत्तरप्रदेश असे मयत तरूणाचे नाव आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, उत्तरप्रदेशातील सिध्दार्थ नगर येथे राहणारा तरूण विशाल यादव हा तरूण नोकरी निमित्त गेल्या चार वर्षापासून मुंबईला वास्तव्याला असून तो मंगळवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी उत्तरप्रदेश येथे गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करीत होता. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रेल्वे ही जळगाव ते भादली दरम्यान धावत असतांना अप रेल्वे लाईनवरील खंबा क्रमांक ४२८ जवळ त्याचा तोल जावून खाली पडल्याने गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला.

 

ही घटना घडल्यानंतर स्टेशन मास्तर यांनी घटनेची माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. आधार कार्डच्या आधारे मयत तरूणाची ओळख पटली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.