रणबीर कपूर दिसणार रामाच्या भूमिकेत !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

‘अॅनिमल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार करत आहे. या बहुचर्चित सिनेमामुळे सध्या तो चर्चेत आहे. ‘अॅनिमल’ या सिनेमानंतर रणबीर आता ‘रामायण’ च्या शूटिंगला सुरुवात करण्यात आहे. या सिनेमात तो रामाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रणबीर कपूरचं नाव काही महिन्यांपूर्वी नितेश तिवारी आणि मधु मंतेना यांच्या आगामी ‘रामायण’ या सिनेमासोबत जोडलं गेलं आहे. या सिनेमासंदर्भात नवे-नवे अपडेट्स समोर येत आहे. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी ‘रामायण’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच ‘केजीएफ’ फेम यशदेखील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.

कधी होणार शूटिंगला सुरुवात ?
नितेश तिवारी आणि मधु मंतेना यांचा आगामी ‘रामायण’ हा सिनेमा रिलीजआधीपासून खूप चर्चेत आहे. या सिनेमासंदर्भात नवे-नवे अपडेट्स समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रामायण या सिनेमात रणबीर कपूर आणि साई पल्लवी आणि सीताच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘रामायण’ या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. नितेश तिवारी आणि मधु मंतेना ‘रामायण’ या सिनेमाच्या शूटिंगला 2024 मध्ये सुरुवात करणार आहेत. अद्याप नितेश तिवारी आणि मधु मंतना यांनी ‘रामायण’ सिनेमाच्या शूटिंगबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.