आव्हाने शिवारातून चार दुचाक्या चोरल्या

0

जळगाव ;- जळगाव कानळदा रोडवरील आव्हाने शिवाराजवळील उड्डाण पुलाजवळ असलेल्या गोडाऊन नजीक लावलेल्या चार दुचाक्या अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार १० डिसेंबर रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शहरातील जीवन मोती नांगर येथे राहणारे अरुण निकुंभ यांनी आपली दुचाकी क्रमांक एमेच -१९ – सिक्यू २०४१ , तसेच त्यांचे सहकारी असलेले प्रवीण नागराज बिडवे रा.चडगाव ता. भडगाव यांची दुचाकी क्रमांक एम एच १९ डीजे ३११६,,, दिनेश विठ्ठल सोनवणे यांची दुचाकी क्रमांक एम एच बीके ५६६९ आणि सुधाकर गणपत बडगुजर रा. पिंपळगाव हरेश्वर यांची दुचाकी क्रमांक जीजे -०५ -०६९२ असा एकूण ९० हजारांच्या दुचाक्या अज्ञात चोरट्याने सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान लांबविल्या. याबाबत अरुण निकुंभ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना गुलाब माळी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.