तरुणीला शिवीगाळ करून मारहाण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील मेहरूण परिसरात तरुणाने तरुणीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, समीर कमरोद्दीन शेख हा तरुणीच्या भावाचा मित्र आहे. भाऊ घरी नसतांना समीर हा तरुणीच्या घरी ये जा करत होता. त्यामुळे तरुणीने समीर यास घरी येत जावू नकोस असे सांगितले असता, गुरुवारी दुपारी तरुणी तिच्या घरासमोर असतांना, समीर याने तरुणीला शिवीगाळ करत तिच्या कानशीलात लगावली तसेच धमकी दिली.

या तरुणीच्या तक्रारीवरुन समीर कमरोद्दीन शेख यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.