कबचौ उमविच्या दीक्षांत समारंभात २० हजार ७५ स्रातकांना पदव्या बहाल होणार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारंभ मंगळवार दि. २४ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न होत असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती मा. भगत सिंह कोश्यारी हे दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान ऑनलाईन पध्दतीने भूषविणार असून दीक्षांत भाषण करणार आहेत.

राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता (NAAC) बंगळुरुचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन हे प्रमुख अतिथी म्हणून स्नातकांना ऑनलाईन संबोधित करतील. या दीक्षांत समारंभास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे ऑनलाईन उपस्थित राहतील. याशिवाय पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, महसुल ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार हे देखील उपस्थित राहणार आहेत.

२० हजार ७५ स्नातक

या दीक्षांत समारंभात २० हजार ७५ स्रातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहेत. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे ९ हजार ३२२ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ५ हजार ७६२ स्रातक, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे ४ हजार ५०८ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे ४८० स्रातकांचा समावेश आहे. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ४०४, मुळजी जेठा महाविद्यालयाचे ४६९, प्रताप महाविद्यालयाचे ३८४, जी.एच. रायसोनी इन्स्टीट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ४०२ अशी एकूण १ हजार ६९५ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल केली जाणार आहे. गुणवत्ता यादीतील ९८ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. या मध्ये ६५ विद्यार्थिनी व ३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी २४ हजार १३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये २१४ पीएच.डी. धारक विद्यार्थी आहेत.

या पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव तसेच स्रातकाच्या आईचे नाव आहे. प्रमाणपत्रावर क्यूआर कोड राहणार असून या कोडच्या सहाय्याने मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे पदवी पडताळणी करता येईल. प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या होलोग्राममुळे प्रमाणपत्राची सुरक्षितता अधिक वाढली आहे. दीक्षांत समारंभाच्या दिवशी प्रशासकीय इमारतीच्या परिसरात स्रातकांसाठी सेल्फीस्टैंड उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या http://www.nmu.ac.in या संकेतस्थळावर स्रातकांसाठी डिग्री कोड देण्यात आला आहे. याशिवाय मोबाईल मॅसेजद्वारे देखील डिग्री कोड पाठविण्यात आला आहे. स्रातकांनी पदवी ग्रहण करण्यासाठी सभारंभाच्या दिवसी प्राप्त झालेली डिग्री कोड, ओळखदर्शक कागदपत्रांसह उपस्थित रहावे.

स्रातकांना पदवी प्रमाणपत्र मिळणे सोयीचे व्हावे याकरीता पदवी प्रमाणपत्राचे व उत्तरीय वाटप अभ्यासक्रमनिहाय खालील प्रमाणे:-

प्रशासकीय इमारतीत काऊंटरवर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दालन क्र. १०७ (सामान्य प्रशासन, आवक – जावक विभाग) : – खिडकी क्र. ०१ वर बी.ए. इंग्रजी आणि डी.पी.ए., बी.एफ.ए., बी.एस.डब्ल्यु. एम.एफ.ए., एम.ए. वुमन स्टडीज, एम. एस. डब्ल्यु (मास कम्युनिकेशन), बी.ए. व एम.ए. म्युझिक, खिडकी क्र . ०२ वर बी.ए. मराठी , हिंदी , संस्कृत , उर्दू , जनरल आणि एम.ए. इंग्रजी , मराठी , हिंदी , संस्कृत व उर्दू तसेच एम.ए. इंग्रजी , मराठी व हिंदी (सीएलएल), खिडकी क्र. ०३ वर बी.ए. व एम.ए.- इतिहास, भुगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, संरक्षणशास्त्र, तत्वज्ञान, ड्रामाटिक्स, योगीकशास्त्र, आंबेडकर थॉटस्, दालन क्र. ११४ (प्रवेश व पात्रता विभाग) खिडकी क्र. ०४ वर बी.एस्सी. केमेस्ट्री, खिडकी क्र. क्र.०५ वर बी.एस्सी. कॉम्प्युटर, फिजिक्स, इलेक्ट्रानिक्स, मॅथेमॅटीक्स, स्टैटेस्टिक्स, खिडकी क्र. ०६ बी. होक सर्व विषय, एम.एस्सी. सर्व विषय व एम.एस्सी. / एम.ए. भुगोलसह खिडकी क्र. ०७ वर बी.एस्सी. बॉटनी, झुलॉजी, जॉग्रफी, जिओलॉजी, बायोकेमेस्ट्री, इनफॉर्मेशन टेक्नॉलाजी, बायोटेक्रॉलॉजी, इन्हार्मेट सायन्स, एक्च्युरिअल सायन्स, बी.सी.ए. (इन्टेग्रेटेड), खिडकी क्र. ०८ वर बी.ई. (सर्व विषय) , बी. आर्कटिक्चर, दालन क्र. १२९ (कार्यकारी अभियंता कार्यालय) खिडकी क्र. ०९ विधी व वैद्यकीय आणि औषधनिर्माणशास्त्र, खिडकी क्र. १० शिक्षणशास्त्र विद्याशाखा, सर्व बी.टेक., एम.टेक व एम.ई. सर्व विषय, दालन क्र. १११ (प्रवेश व पात्रता विभागा शेजारी) खिडकी क्र. ११ वर पीएच. डी. सर्व विषय, एम. फिल, खिडकी क्र. १२ वर बी. कॉम. खिडकी क्र. १३ एम.कॉम, व्यवस्थापनशास्त्र सर्व विषय, खिडकी क्र. १४ (चौकशी कक्ष) वर दिव्यांगसाठी (सर्व अभ्यासक्रम), खिडकी क्र. १५ वर पदवी कोड शोधणे, सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची नाव नोंदणी प्रशासकीय इमारत, बांधकाम विभाग, विद्यापीठ उपअभियंता दालन क्र. १२५ मध्ये करण्यात येणार आहे.

याबाबतचा सर्व तपशील विद्यापीठाच्या http://www.nmu.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. समारंभस्थळी सकाळी ठिक ८ वाजता विद्यार्थी व निमंत्रितांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. समारंभासाठी विद्यार्थ्यासाठी पांढऱ्या रंगाचा शर्ट, पांढऱ्या रंगाची पैन्ट किंवा पांढऱ्या रंगाचा नेहरू शर्ट आणि पांढऱ्या रंगाचे चुस्त तर विद्यार्थिनीसाठी लाल किनार असलेली पांढरी साडी, लाल रंगाचे ब्लाऊज किंवा लाल रंगाचा कुर्ता (कमीज) व पांढऱ्या रंगाची सलवार असा पोशाख असावा.

तसेच सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (live) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होणार आहे. सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांनाही बघता यावे यासाठी महाविद्यालयांनी व्यवस्था करावयाची आहे. या बाबत सर्व महाविद्यालयांना सूचना निर्गमीत केलेल्या आहेत. विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणाऱ्या समारंभाची तयारी पूर्ण झाली असून जवळपास दोन हजार निमंत्रितांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून, या सर्व समित्यांमार्फत कामकाजाचा आढावा कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.