महापालिकेत महापौर जयश्री महाजन यांचे हस्ते ध्वजारोहण…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 15 ऑगस्ट 2023 मंगळवार रोजी सकाळी 7:30 वाजता महापौर सौ. जयश्री सुनील महाजन यांचेहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रथम राष्ट्रगीत, त्यानंतर झेंडा गीत, व सर्व उपस्थितितांना पंचप्रण शपथ, मा. महापौर जयश्री सुनील महाजन  यांनी दिली.

तसेच मातृभूमीचे स्वातंत्र्य आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांना अभिवादनाच्या “शिलाफलक”चे मा. महापौर सौ जयश्री सुनील महाजन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सदर शिलाफलकाची उभारणी मनपा प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात करण्यात आली.

सदर शिलाफलकावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव, दिनांक, पंतप्रधानांचा संदेश, शहीद वीरांची नावे, “आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपल्या मातृभूमीच्या अभिमानासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा थोर विभूतींना विनम्र अभिवादन” असे वाक्य. इत्यादी बाबी त्यावर नमूद करण्यात आलेल्या आहेत.

कार्यक्रमात जे.बी.पाटील माध्यमिक विद्यालयाच्या एकूण 200 विद्यार्थी/ विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग घेतला, तसेच देशभक्तीपर गीतातून भारतीय बॉर्डर वरील सैनिकांचे सैनिकीय प्रात्यक्षिक स्वातंत्र्यवीरांचे प्रतिरूप दाखवून वंदन करून केले. बॉर्डरवरील प्रत्यक्ष क्षणाचे यावेळी त्यांनी सादरीकरण करण्यात आले. शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा परिधान करून आपल्या कलागुणांचे प्रात्यक्षिक दाखवून भारत मातेला वंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.